महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनकडून गृहरक्षक दलातील जवानांना सुरक्षा साधनांचे वाटप

मुंबई – गृहरक्षक दलातील जवान हे बीएमसी आरोग्य विभाग व स्थानिक पोलिस स्टेशन येथे रात्रंदिवस बंदोबस्त करत आहेत त्यांत त्यांना मानधनही वेळेवर मिळत नाही अशा आर्थिक परिस्थितीत कुटुंब सांभाळून मुंबई गृहरक्षक दलातील जवान देशसेवा करत आहे त्यांना महासमादेशक होमगार्ड व बीएमसी मार्फत सुरक्षेसाठी लागणारे साधनसामुग्री वेळेवर देत नाही सीटीआय घाटकोपर येथील वेतनी निर्देशक अधिकारी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही मुंबई होमगार्डच्या आरोग्याची कोणती हि काळजी घेतली जात नाही एक प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम वेतनी अधिकारी करत आहे त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तथा होमगार्ड संघर्ष समिती संस्थापक रवि ना वैद्य, सिद्धार्थ डी जाधव- प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य , धीरज पार्सेकर – निवड समिती अध्यक्ष म रा, अमोल माने प्रदेशाध्यक्ष मुंबई , अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई यांच्या मार्फत मुंबई गृहरक्षक दलातील जवानांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी औषध, सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here