जळगाव (दीपककुमार गुप्ता) – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील वाळू ठेक्याची मुदत मिळावी म्हणून ठेकेदाराने मिश्किली शक्कल लढवली आहे, शासनाने दिलेल्या कालावधीत चलन भरले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, वाळू ठेका घेताना एकूण सतरा लाख ६८ हजार नऊशे रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करायचे होते मात्र शासनाची दिशाभूल करण्याकरिता वैद्यकीय कारण दाखवून वेळ मारून नेली आहे, लॉकडाऊन च्या कोरोनाचे संकट निवारण्या करिता काळात प्रशाकीय यंत्रणा व्यस्त असल्याने अवैध साठेमारीच्या उद्देशाने ठेका मिळवण्याकरिता मक्तेदाराने महसूल विभागाची दिशाभूल केली असल्याचा संशय आहे आपल्या बुद्धी चातुर्याने पैशाच्या जोरावर पुन्हा ठेका मिळवण्याकरिता खटाटोप सुरु केला आहे. शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धरणगाव मधील बाभुळगाव येथील महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध साठ्याचा लिलाव केला आहे मक्तेदार दिपक कमलाकर अत्तरदे यांच्या नावे निघालेल्या ह्या निविदे नुसार ४६० ब्रास वाळू साठ्याची रक्कम भरणे अनिवार्य होते मात्र ह्या प्रकरणी निविदा करताना मोठा घोळ झाल्याचा संशय बळावत आहे, ह्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास सत्य ते समोर येणार आहे.






