पंढरपूर तालुका पोलिसांकडून विकसित गाव जलतारा कार्यक्रमाचे आयोजन

विकसित गाव जलतारा

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेज येथे विकसित गाव जलतारा कार्यशाळा अतिशय कमी वेळामध्ये स्वेरी कॉलेज प्रशासनाने खूप सहकार्य केले आणि आज दिनांक 23 मे 2019 रोजी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

विकसित गाव जलतारा या कार्यशाळेचा मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व शेतकरी आणि पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित नागरिकांना केले विकसित गाव जलतारा योजनेचे महत्त्व आणि त्याचे फायदे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पाण्याचा साठा वाढवता येतो याबाबत मार्गदर्शन पोलीस अधीक्षक यांनी केले.
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी नाना कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले, पविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढा व इतर सर्व पोलीस अधिकारी सर्व गावचे पोलीस पाटील सरपंच प्रतिष्ठित नागरिक शेतकरी मित्र शेतीतज्ञ पोलीस अंमलदार अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विकसित गाव जलतारा अभियान कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पार पडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here