उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 50 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

उजनी धरणा

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : उजनी धरणा मधून भीमा नदीपत्रात सुरु असणारा विसर्ग शनिवारी रात्री आठ वाजता वाढवून तो 50 हजार क्युसेक्स इतका करण्यात आला. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना उजनी धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याने उजनीतून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज रविवारी सकाळच्या 9 च्या प्राप्त आकडेवारी नुसार दौंड बंधा-यातून उजनी धरणात 22780 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग येत असून उजनीतून भीमा पात्रात 50 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरण सध्या 102 टक्के भरलेले असून उजनीत 118 टीएमसी पाणीसाठा आहे.
पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडेवाडी हा पुल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे अजनसोन हा पूल सुमारे तीन फूट पाण्याखाली गेलेला आहे त्याचप्रमाणे जुना दगडी पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले असून तिन्ही पुलावर्ती लोखंडी व बांबूची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे तिन्ही पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here