हिंगोली (प्रतिनिधी) : पीडित मुलगी गरोदर राहिल्याने बापानेच पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीवे मारण्याची धमकी देत बापाने मुलीसोबत हे कृत्य केले. याप्रकरणी बापाविरोधात गुन्हा दाखल करत हिंगोली पोलिसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केला. बापाने सातत्याने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली त्यानंतर हा प्रकार उघड झाला. बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत बापाला अटक केली. पत्नी डोळ्याने अंध असल्याचा फायदा घेत बापाने आपल्या लेकीलाच वासनेची शिकार बनवले होते.
बलात्काराविषयी कुणाला सांगितले तर जिवे मारून टाकू अशी धमकी देखील तो आपल्या मुलीला देत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.







