जळगावमध्ये एकाच दिवशी १९८ प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या

collector-office-jalgaon

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सोमवार (दि.२६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील तब्बल १९८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी ५३, महसूल सहाय्यक (क्लर्क) ४४, मंडलाधिकारी ३५, चालक ५, आणि तलाठी ५८ जणांचा समावेश आहे.
बदल्यांसोबत तलाठीपदावरून मंडलाधिकारीपदी तीन जणांची पदोन्नतीही यावेळी जाहीर करण्यात आली. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here