अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यदवर कारवाईची मागणी

बीजेपी निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अमळनेरातील रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवदेन भाजप जळगाव महानगरच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना आज देण्यात आले.

निवदेनात म्हटल्याप्रमाणे, अमळनेर तालुक्यातील धानोरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप रऊफ बँडचा संचालक अस्लम अली सय्यद याच्यावर असून याप्रकरणी चौफुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रऊफ बँडच्या वाहनांचा गैरवापर करून ही घटना घडल्याचे समोर आले असून यामुळे वाहतूक व परिवहन नियमांचा भंग झाला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रऊफ बँडचे वाहन तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस तपासात समाविष्ट करून आरोपी अस्लम अली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी. तसेच या प्रकरणासंबंधी संपूर्ण पथकाची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपकडून करण्यात आली आहे.

ही घटना समाजात भीती व अस्वस्थता पसरवणारी असून, यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी मागणी देखील भाजपने केलीय. यावेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भारती सोनवणे, प्रदेश चिटणीस व माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here