पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : पारोळा पोलिस स्टेशनचे सुनिल पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली त्यांचा जागेवर पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४ जुनं रोजी त्यांनी पारोळा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला. मागिल काळात तालुक्यातील गुन्हाचे प्रमाण कमी होवुन सराईत आरोपिवर ठोस कारवाई झाल्याने नागरिकान मधुन समाधान व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी परिसरातिल अवैध धंदे गावठी दारू विक्री बाबत अवैध गौण खनिज वाळु मुरूम मटका जुगार या बाबत ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







