दुबईत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात : ऐतिहासिक सोहळ्याने मराठी अस्मिता जागृत

शिवराज्याभिषेक सोहळा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सीएमएस (छत्रपती मराठा साम्राज्य) या जागतिक मराठी संघटनेतर्फे आयोजित “शिवराज्याभिषेक सोहळा – दुबई २०२५” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम स्विस इंटरनॅशनल स्कूल, अल जद्दाफ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष होते.

कार्यक्रमास भारताचे प्रधान कौंसलावास, दुबईचे चांसरी प्रमुख बिजेंद्र सिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांच्यासोबतच शिवश्री सतीश राऊत (उप जिल्हाधिकारी , महाराष्ट्र सरकार), शिवश्री डॉ. प्रमोद बोराडे (सुप्रसिद्ध शिव व्याख्याते) यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच शिव शाहीर दिलीप सावंत – शिव-शाहू पोवाडा मंच, कोल्हापूर यांनी अप्रतिम पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

दुबईया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत युवराज मालोजी राजे छत्रपती यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव ते दुबईतील या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही, त्यांच्या शुभेच्छा आणि संदेशाने उपस्थितांमध्ये विशेष ऊर्जा निर्माण झाली. या सोहळ्यास मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक फोटो व माहितीचे एक्झिबिशन भरवले होते त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. सीएमएस टीम कडून संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या जीर्णोधारासाठी पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने व दीप प्रज्वलनाने झाली, जिजाऊ ब्रिगेड दुबई टीम ने या मधे उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. जिजाऊ वंदना सादरीकरणात सुनीता देशमुख, प्रियांका भोसले, अदिती मैद , साधना आवटे , नीलम ईगावे, शुभांगी पाटील यांनी सहभाग घेतला. विक्रम भोसले, मुकुंदराज पाटील व अभिजीत इगावे यांनी दिलेली शिव-शंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले.शिवज्योती, ढोल-ताशा, पोवाडे, व्याख्याने आणि सांस्कृतिक सादरीकरणाने सजलेला हा सोहळा दुबईतील मराठी बांधवांसाठी एक पर्वणी व अभिमानाचा क्षण ठरला. स्वामिनी ढोल ताशा पथक आणि श्रीमंत ढोल ताशा पथक यांनी दिलेल्या स्फूर्तीदायक सादरीकरणाने वातावरणात राष्ट्राभिमानाची लाट उसळली.

दुबई१० वर्षांची खुशी बोराडे हिने सादर केलेला जोशपूर्ण पोवाडा , कु. ईभान मिस्त्री आणि मिलिंद माणके यांनी शिवरायांवर गाणे सादर केली आणि स्वामिनी ढोल ताशा टीमने सादर केलेला“ताराराणी साहेब” यांच्यावर आधारित नाट्यप्रयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेला.विनायक पवार यांनी मुलांसाठी शिवकालीन अलंकार व आभूषण प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन केले. अभिजीत देशमुख यांनी छत्रपती मराठा साम्राज्य- CMS संस्थेच्या कार्याची माहिती सर्वांना दिली.अभिजीत इगावे यांनी CMS ने पुढाकार घेवून चालू केलेल्या महाराष्ट्र सदन -दुबई या संभाव्य प्रकल्पाबद्दल माहिती दिली.योगेश मैद यांनी दुबई मधील मुलांसाठी चालू केलेल्या काइंडनेस या प्रोजेक्ट बद्दल ची माहिती दिली व द काइंडनेस प्रोजेक्ट च्या लोगो चे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले.

संदीप कड यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे विशेष महत्व सर्वांना सांगितले. संदीप कड यांच्या मार्गदर्शनातील एक चित्रफीत सादर करण्यात आली ज्याने उपस्थित प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सूत्रसंचालनाची जबाबदारी पंकज आवटे , संदीप कड आणि अश्विनी गावडे यांनी प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने , प्रीतेश पटाडे व टीम यांनी व्यवस्थित पार पाडली. शेवटी रघुनाथ सगळे पाटील यांनी आभार व्यक्त केले.

दुबईया सोहळ्याला विनोद जाधव, राहुल घोरपडे, विजेंद्र सुर्वे, जाई कदम-सुर्वे, सुनीता देशमुख, डॉ. दीप्ती येसाडे, जतिन परब, इस्माईल घिवाला, महेश येसाडे, आशिष जगताप, मिलिंद देशमुख, जय भोसले,साई पेडणेकर, सतीश काटे, नीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यासाठी अभिजीत देशमुख, विक्रम भोसले, संदीप कड, मुकुंदराज पाटील, अमोल डुबे पाटील, अभिजीत ईगावे, विशाल जगताप, योगेश मैद, पंकज आवटे, रघुनाथ सगळे, शिवाजी काका, अन्वर खान, सचिन कदम, गणेश भवानी मंडळ, सत्यशोधक दुबई टीम यांनी विशेष व अथक परिश्रम घेतले.

शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, मराठी इतिहास, स्वाभिमान आणि एकात्मतेचा जागर करणारा अनुभव ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि परंपरेची गुढी जगभर उभारणाऱ्या या उपक्रमासाठी उपस्थितांनी आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. दुबई येथे सलग 3 र्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासा- संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह,उम अल क्विन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here