जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : बुधवारी (दि. ४) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला धरणगाव येथे दिव्यांगाना ५ टक्के निधीचे वाटप करण्यात अाले.
या निधीचे ३१७ लाभार्थी असून, त्यांना प्रत्येकी २२०० रुपये याप्रमाणे निधी वाटप करण्यात आले. निधीचे वाटपप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवासजी झवर व नगरपालिकेचे कर्मचारी व तालुका अध्यक्ष संजय पाटील, रवींद्र रमेश काबरे, व रमेश भाऊ चौधरी, प्रमोद भाऊ सुतारे , पवन पाटील , रवि भाऊ महाजन , गुलाब माळी, मधुकर चौधरी, राजू चौधरी, बाबूलाल पटेल, असेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.







