फैजपूर येथे कौमी एकता फाउंडेशनचा गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत जनजागृतीचा पुढाकार

कौमी एकता फाउंडेशन

सावदा (प्रतिनिधी अजहर खान): फैजपूर येथील कौमी एकता फाउंडेशनच्या वतीने नुकतीच एक सभा संपन्न झाली. या सभेत सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आणि राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शासनाने परवानगी दिलेल्या जनावरांचीच कुर्बानी करावी, तसेच कायद्याच्या नियमावलीचे पालन करावे, असे सर्वानुमते ठरले. या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.

सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी फाउंडेशनने गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत सोशल मीडिया आणि पॅम्प्लेट्सच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संकल्प केला. यासाठी लवकरच परिसरात मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

कुर्बानीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना:
कौमी एकता फाउंडेशनने मुस्लिम बांधवांना कायद्याचे पालन करत कुर्बानीचा फरीजा पार पाडण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये खालील सूचनांचा समावेश आहे:कायदेशीर जनावरांचीच कुर्बानी: महाराष्ट्रात गाय, बैल आणि त्यांच्या जातीच्या जनावरांवर कुर्बानीस बंदी आहे. त्याऐवजी बकरी, मेंढी, भैंस, कटरा यांसारख्या परवानगीप्राप्त जनावरांची कुर्बानी करावी.साफसफाईचा खबरदारी: कुर्बानीदरम्यान रस्त्यावर रक्त किंवा कचरा टाकू नये. स्वच्छतेची काळजी घ्यावी.सोशल मीडियावर संयम: कुर्बानीचे व्हिडिओ किंवा रक्तरंजित दृश्ये व्हायरल करणे टाळावे.कायद्याचे पालन: मांसाची वाहतूक करताना काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये.प्रशासनाशी सहकार्य: अनपेक्षित परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे.सामाजिक शांतता: सामाजिक सौहार्द बिघडवणारी कृती टाळावी.

या सभेत फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सचिव सय्यद जावेद, सय्यद असगर, आसिफ दादा मोहम्मद, जफर खान, कलीम खान, एड. शेख खालिद, जाबिर खान, शेख रफिक, शेख आसिफ, शेख आरिफ, शेख इद्रीस, हमीद शेख, शेख अकील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. फाउंडेशनच्या या कौतुकास्पद पुढाकारामुळे परिसरात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here