हळद पीक ठरते शेतकऱ्यांसाठी “सुवर्णक्रांतीची नांदी”

हळद

– नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे नगदी पीक म्हणून “हळदी”ची ओळख.
– शासन दरबारातील दुर्लक्षित पीक घडविते कृषीक्रांती.
– जिल्ह्याभरात हळद लागवडीच्या क्षेत्रात 30 टक्के वाढ.
– खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर ठरते हळद भारी.

हिंगोली (जिल्हा क्राईम रिपोर्टर विष्णु हनवते) : ठराविक कालावधीनंतर शेतकऱ्यांसाठी आधार ठरणाऱ्या अनेक पिकांपैकी व कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनातून पारंपारिक सध्याच्या सोयाबीन पीक पेरणीला फाटा देत, आता शेतकरी मोठ्या संख्येने हळद लागवडीकडे वळत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून वाढत्या हळद क्षेत्र लागवडीतून शेतकऱ्यांसाठी “सुवर्णक्रांतीची नांदी” चे संकेत दिसून येत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत येथे आकार घेत आहे. याकामी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, सहाजिकच 15 ते 20 टक्क्यांनी दरवर्षीला हळद लागवडीतील होणारी वाढ ही हिंगोली जिल्ह्याला “हळद उत्पादकांचा जिल्हा” म्हणून ओळख करण्याच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील हळदीला जागतिक स्तरावर भौगोलिक नामांकन प्राप्त होत “वसमत हळदी” ने संबोधले जात आहे.

हळद लागवडजिल्ह्यातील 3 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 2 लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीन, तूर, हळद कापूस यासह इतरही पिकांची लागवड करण्यात आली. मात्र मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षीला 2000 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पेऱ्यामध्ये घट होत, या जमिनीवर शेतकरी हळद लागवडीचे नियोजन करीत आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास 40 ते 45 हजार हेक्टरवर हळद लागवड होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दर्जेदार हळद बेण्याची उपलब्धता व वेळोवेळी मार्गदर्शन
मराठवाडा विभागात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र वसमत येथील केंद्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच हळदीचे विविध वाणांचे शुद्ध व दर्जेदार बेणे खरीप 2024 मध्ये 380 क्विंटल बेणे उत्पादित केले. त्यातील 200 क्विंटल पेक्षा अधिक बेणे शेतकऱ्यांना दिले. तसेच 45 हजार दर्जेदार रोपेही उपलब्ध करून देत शेतकऱ्यांनी लागवड केली होती. या बेण्याची लागवड करून इतर शेतकऱ्यांना खरीप 2025 मध्ये जवळपास 1200 क्विंटल बेणे व प्रोटेड पद्धतीने जवळपास 2.50 लाख रोपांची लागवड करून, ना नफा ना तोटा या माफक दरामध्ये शेतकऱ्यांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून केलेल्या विविध स्तरावरील प्रयत्नातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीला चांगले दर मिळत आहेत. या दरातील स्थिरता पाहता, आगामी काळात यापेक्षाही हळदीला चांगला दर मिळेल असा विश्वास असल्याने शेतकरी हळद लागवडीकडे स्वतःहून वळत आहे. मागील वर्षी हिंगोली जिल्ह्यात 36000 हे. क्षेत्रावर हळदीची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र 50,000 हेक्टर च जवळपास असणार आहे.

5 वर्षातील हळदीचे सरासरी बाजारभाव
वर्ष भाव
2020-21 – 4956
2021-22 – 7159
2022-23 – 6566
2023-24 – 11058
2023-24 – 13348

शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी हळद संशोधन केंद्र ठरणार दिशादर्शक
शेतकऱ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण, चर्चासत्र व वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच हळदीचे नवीन संकरित वाण, खत व पाण्याचे योग्य नियोजन, कृषी अवजारे व यांत्रिकीकरण, बॉयलर, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, हळद काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य, माती व पाणी तपासणी केंद्र यासह इतरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हळद संशोधन केंद्राच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांनी हळदीचे उत्पन्न वाढवावे. त्याचबरोबर हळद संशोधन व प्रक्रिया उद्योग उभारणीच्या माध्यमातून सुवर्णक्रांतीकडे वाटचाल करावी. जेणेकरून या संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचविण्यास निश्चितच मदत होणार आहे.

हळद संशोधन व हळद क्लस्टरसाठी वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारातील 100 एकर जमिनीवर लॉजिस्टिक पार्क उभारणीतून जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न बहुतांश मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

सोयाबीन पेऱ्याला बगल ; उत्पन्नापेक्षा लागवड खर्चच जास्त
सोयाबीनचा बाजारभाव 2012 मध्ये 4200 होता. 2023 मध्ये सोयाबीनचा भाव सरासरी 4300 होता. मागील 11 वर्षात सगळ्या गोष्टींच्या किंमती वाढल्या, परंतु सोयाबीनला मिळणारा भाव तिथेच आहे. सोयाबीन लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा खर्च बघता, बाजारपेठेत मिळणारा भाव हा अतिशय कमी आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्चच जास्त व परवडणारा नसल्यामुळे सोयाबीनला बगल देत, बहुतांश शेतकरी आता हळद लागवडीकडे स्वतःहून वळत आहे. त्यामुळे मराठवाडा- विदर्भात सोयाबीनवर हळदच भारी परत असल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे.

सोयाबीनचे सरासरी बाजारभाव
वर्ष भाव
2020-21 – 3450, 3650
2021-22 – 3800 , 3950
2022-23 – 4300, 4500
2023-24 – 4600, 4750
2024-25 – 4400, 4892

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here