पारोळा (तालुका क्राईम रिपोर्टर समाधान धनगर) : तालुक्यातील भारतीय जनता पार्टी तर्फे 5 जून वृक्ष रोपण दिवस असून दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे शिवराज्याभिषेक व वृक्ष लागवड भुईकोट किल्ला येथे करण्यात आली.
वृक्ष लागवडीचे ठिकाणे पर्यावरणाविषयी माहिती देण्यात झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा या विषयी घोषणा देण्यात आल्या,
कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री रोहन वसंतराव मोरे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, जिल्हा चिटणीस नाना सुखदेव पाटील,सयोजक राजेंद्र चौधरी, युवराज नाना पाटील, देविदास जी पाटील, वालचंदजी नंदवाणी, सोनवणे सर, बंडू नाना वाणी, प्रकाशजी पुरकर, भूषण टिपरे, अमोल देशमुख, राहुल पाटील सर, हे यावेळी उपस्थित होते







