माळशिरस तहसीलदारांना नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे निवेदन

नाथपंथी

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : नाथपंथी डवरी गोसावी समाज मेडद द्वारा आयोजित मोटार सायकल रॅली आणि पदयात्रा मध्ये सामील झालेले मेडद आणि सबंध माळशिरस तालुक्यातून मोठ्या संख्येने नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये (बहुरूपी इत्यादी) पारंपारिक वाद्य संबळ, डवर, तुंतुने, टाळ इत्यादी सह श्री काळभैरवनाथाची पारंपरिक गीत गायन करत आपल्या कलेचे सादरीकरण करत तसेच पवित्र शंख नाद करत श्री कालभैरवनाथ देवस्थान मेडद येथे कालभैरवाष्टक गायन करून ते तहसीलदार कार्यालय माळशिरस येथे प्रचंड वाजत गाजत पोहोचले.

तहसीलदार माळशिरस यांचे मार्फत महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे सह मंत्री अतुल सावे त्यांच्याकडे सर्व समाज बांधवांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सादर केले. याद्वारे परम पूज्य गंगाराम महाराजांचे नाव तात्काळ हटवून आमच्या समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे नाव ” नाथपंथी आर्थिक विकास महामंडळ” असे करून आमच्या महामंडळाला कसल्याही प्रकारे उप कंपनी न ठेवता पूर्णपणे स्वातंत्र्याने स्वायत्तता द्यावी त्याबाबतचे शुद्धिपत्रक शासनाने तात्काळ प्रसिद्ध करावे असे नम्र निवेदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here