गावठी कट्टा विक्रीकरिता आलेल्या इसमांना जळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

गावठी कट्टा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यातील पाल परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दोन बेकायदा गावठी कट्टे, दोन मोटार सायकली व दोन मोबाईल असा एकूण एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोविंदसिंग ठानसिंग बर्नाला व निमानसिंग जिवनसिंग बर्नाला अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

दोघे तरुण गावठी कट्टे विक्रीसाठी मध्य प्रदेशातून रावेर तालुक्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे आणि हे कॉ गोपाल गव्हाळे या दोघांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, स फौ रवी नरवाडे, हे कॉ गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ नितीन बाविस्कर, पो कॉ बबन पाटील, पो.हे.कॉ. दिपक चौधरी आदींच्या पथकाने या तपास कामगिरीत सहभाग घेतला. दोघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here