नाशिक जिल्हा बँक विठेवाडी शाखेला ठोकले ग्रामस्थांनी कुलुप; शाखा स्थलांतरीत करण्यास ठाम विरोध

नाशिक जिल्हा बँक
विठेवाडी येथील जिल्हा बँक शाखेला कुलुप टोकताना. संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव, महेंद्र आहेर व इतर ग्रामस्थ व संचालक, तसेच शेतकरी संघटना व. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कुलुप लावुन निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : नाशिक जिल्हा बँक विठेवाडी शाखा क्रमांक १७९ विठेवाडी स्थलांतरण रद्द करणे बाबत.पुनरर्विचार व्हावा म्हणून आज दिनांक १९-०५-२०२५ रोजी सकाळी दहा वाजता विटेवाडी गावातील शेकडो ग्रामस्थ व स .सोसायेटी संचालक ,सभासद, व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने.सोसायटीच्या आव्हारात एकत्र येऊन विठेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा इतरत्र हलवण्याचा एकतर्फी निर्णय जिल्हा बँक प्रशासकांनी घेतलेला आहे.

या निर्णयाला सामुदायिक विरोध दर्शवण्यात आलेला आहे कारण जिल्हा बँक शेतकऱ्यांची संस्था असून गावातील ९०टक्के आर्थिक व्यवहार या शाखेतून होत आहेत. विशेष बाब म्हणजे विठेवाडी भउर सावकी व खामखेडा या ४ गावाचा आर्थिक व्यवहार हे विठेवाडी शाखा क्रं १७९ शाखेतून केले जात आहेत. या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली संदर्भात आव्हान केले असता विठेवाडी विविध कार्यकारी सोसायटीने शंभर टक्के बँक पातळीवर वसुली देऊन बँकेच्या आव्हानास प्रतिसाद दिला आहे असे असताना बँकेने शाखा इतरत्र हलवणे गैर आहे.
याबाबतच चारही गावातील विकास संस्थांनी शंभर टक्के विरोध केलेला आहे. तरी याबाबत जिल्हा बँक प्रशासकांनी पुनर्विचार करावा त्यासाठी समक्ष गावकऱ्यांच्या वतीने आम्ही विविध कार्यकारी सोसयेटीच्या मालकीच्या जागेवर असलेल्या शाखेला कुलूप लावत आहोत, जोपर्यंत सदर शाखा चालू होत नाही. तोपर्यंत कुलूप उघडण्यात येणार नाही.व येथिल शाखा कार्यालयातुन कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व साहित्य बाहेर जाऊ दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी,यावर ग्रामस्थ व सभासद ठाम आहेत. तरी याबाबत बँक प्रशासकाने विचार करून जिल्हा बँकेची शाखा विठेवाडी गावातच चालू ठेवावी. शाखा क्रमांक 179 इतरत्र हलवल्यास तिव्र विरोधास आणि आंदोलनास सामोरे जावे लागेल. यास प्रशासक जबादार असतील. याची नोंद घ्यावी.
सकाळी ११ वाजता शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त केला शाखेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले, यावेळी विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव,व्हा चेअरमन कैलास कोकरे , महेंद्र आहेर ,पि,डी, निकम, समाधान निकम , प्रशांत निकम, बाळासाहेब सोनवणे, अभिजित निकम,शशीकांत निकम, तानाजी निकम.संजय सावळे, राहुल निकम,विलास निकम, माणिक निकम,राजु निकम, ईश्वर निकम,मधु निकम, शिवाजी निकम,जिभाउ बोरसे,विठोबा सोनवणे, शंकर निकम, बापू सावळे,तकदिर कापडनिस , भास्कर निकम, निंबा निकम,तुषार निकम,भिका शेळके,संजय निकम, सुभाष पगार,योगेश निकम, काशिनाथ बोरसे आदी सह शेकडो ग्रामस्त व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभासद व संचालक उपस्थित होते, शेवटी जिल्हा बँकेच्या विठेवाडी शाखेच्या कार्यालयाला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन , तसेच संचालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने कुलुप ठोकण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here