सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला मंगळवारी (११ जून २०२५) दणक्यात सुरुवात झाली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे, मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. सावदा शहर शिवसेना प्रमुख सुरज (बद्री भाऊ) परदेशी यांनी सांगितले की, या अभियानात सावदा शहरात २,००० सभासदांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.
या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक शाम अकोले, युवासेना शहरप्रमुख मनीष भंगाळे, सोहेल खान, निलेश खाचणे, गणेश माळी, शुभम लोणारी, भूषण परदेशी, विकी वाघूळदे, मोईन खान, राकेश बोराखडे, चेतन माळी, वेडू लोखंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. “बाळासाहेबांचे विचार जपूया, शिवसेनेचे सदस्य होऊया,” असा संदेश देत या अभियानाला गती देण्यात येत आहे.
सुरज परदेशी आणि मनीष भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या या अभियानात शिवसैनिक उत्साहाने सहभागी होत आहेत. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवसेनेची ताकद वाढवावी, असे आवाहन शिवसेना नेत्यांनी केले आहे.







