इचलकरंजी येथे आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा

प्रशिक्षण कार्यशाळा

इचलकरंजी (प्रतिनिधी सतिश चव्हाण) : इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक ०१/०५/२०२५ ते दिनांक १५/०८/२०२५ या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजरोजी रविवार दिनांक – ०८/०६/२०२५ रोजी इचलकरंजी लायन्स ब्लड बँक येथे मुख्य आवारात स्वयंसेवकांना प्रशिक्षण माहिती देण्यात आली.

यावेळी माणूसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि नौशाद जावळे आणि टिम तसेच पोलिस बॉईज असोसिएशन इचलकरंजीचे सतिश आण्णाप्पा चव्हाण आणि टिम यांना आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रींचे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची विविध कार्यप्रणाली यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित करत ते आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे राबविले पाहिजे या विषयी सविस्तर माहिती स्वयसेवकांस देण्यात आली.

प्रशिक्षण कार्यशाळा

तसेच ती साहित्य सामग्री कशाप्रकारे हाताळवयाची वा कोणती खबरदारी घ्यायची याविषयी संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री.संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता ४० शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका-प्रश्नांचे निराकरण करणेत आले, व आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना आपली सतर्कता बाळगून कशाप्रकारे सज्ज राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक स्वयंसेवक मुला- मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here