भुसावळातील हॉटेल चालकाला चाकू व तलवार लावत मारहाण; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

crime
file photo

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : शहरातील रजा टॉवर भागातील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर हॉटेल मालकाने बिल मागितल्याच्या रागातून आरोपींनी चाकूसह तलवार दाखवत हॉटेल चालकासह कुटूंबाला शिविगाळ करीत मरहाण करून पाच हजार रुपये लूटण्यात आले.

ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी कुविख्यात तस्लीम काल्यासह नऊ आरोपींविरोधात दरोड्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रोशन होलाराम सचदेव (वय ४०, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचे रजा टॉवरजवळ अंगारा नावाचा ढाबा आहे. शनिवारी (दि.१४) दुपारी ४.३० वाजता रोशन सचदेव हे दुकानावर असताना ग्राहकांना जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून संशयित आरोपी शेख नईम शेख सलीम, तसलीम उर्फ काल्या सलीम शेख, वसीम शेख सलीम शेख, शेख सलीम शेख सिकंदर, आशु बबलू ठोंबरे, आकाश अशोक लोंढे, आदिल खान शोएब खान, शेख वसीम उर्फ शेख चांद आणि आरान शेख वसीम (सर्व रा.भुसावळ) यांनी चाकू काढून धमकावत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान आरोपी शेख नईमने पोटाला चाकू लावत शर्टाच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले व त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराची पत्नी सोनी आणि मुलगा आदित्य यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली.
रोशन सचदेव यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावर, रविवारी (दि.१५) ९ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातीन तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here