खडसे फार्म शेतामधील गोड पिवळी खजूर मार्केटमध्ये होलसेल व किरकोळ विक्रीसाठी दाखल

खडसे फार्म

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज (दि.१५) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी कृषी , अर्थ व नियोजन , पाटबंदारे मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या शेतामधील पिवळी गोड खजूर विक्री साठी बाजारात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

नागरिकाना योग्य व होलसेल , किरकोळ विक्रीसाठी भाऊंचे उद्यान, डी एस पी चौक , सांगर पार्क जवळ , स्टेंट बॅक शिवाजी महाराज स्टेडियम जवळ , टॉवर चौक, नेरी नाका, कवियत्री बहिणाबाई चौधरी बगीचाजवऴ, शिव कॉलणी, कालीका माता चौक या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असल्याचे अशोक लाडवंजारी यांनी सांगितले.
या स्टॉलचे उद्घाटन व्यापारी इब्राहिम बागवान यांच्या हस्ते ग्राहक नेरकर यांना देऊन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे , माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी , माजी नगरसेवक सुनिल भैय्या माळी , माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे , माजी नगरसेवक डॉ रिजवान खाटीक , माजी जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस आदिवासी विकास विभाग इब्राहिम तडवी, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार महानगर जिल्हाउपाअघ्यक्ष किरणभाऊ राजपुत , राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार महानगर सरचिटणीस रहिमभाऊ तडवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here