नांदुरा पोलिसांच्या छाप्यामध्ये चोरी केलेली विद्युत तार जप्तच 3 गुन्हे उघड, एक आरोपी जेरबंद

नांदुरा

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : आज (दि.१५) नांदुरा पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फतीने खात्रीशीर खबर मिळाली की डागा पेट्रोल पम्प जवळ खामगावं रोडवर शेख मुखतार शेख निसार याच्या गोडाऊन मध्ये एमएसईबीची विद्युत वहिनीची तार ही चोरी करून आणून लपवून ठेवलेली आहे.

त्या खबरे वरुन नांदुरा पोलिसांनी २ पंच व एमएसईबीचे अभियंता श्री.जैस्वाल यांना सोबत घेवून छापा मारला असता त्या गोडाऊनमध्ये भंगारात लपवून ठेवलेली १ हजार ६०५ किलो ॲल्यूमिनियमची विद्युत तार किंमत ४ लाख २५ हजार रुपये आरोपी शेख मुखतार शेख निसार यांच्या जवळून जप्त केली. एमएसईबीचे अधिकारी श्री.जैस्वाल व श्री.गोरे, इंजिनियर श्री.राठोड, शेख जुनेद यांनी ही ती तार ही एमएसईबीची शासकीय तार असून, निमगावं, अलमपूर शेत शिवारातील चोरीस गेलेली तार असल्याचे ओळखून सांगितल्याने सदर तार ही आरोपीकडून जप्त करण्यात आली. आरोपीचा मुलगा शेख सोहेल शेख मुख्तर हा फरार असल्यामुळे त्याचा ही शोध नांदुरा पोलीस घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहापोउपनि मिलींद जवनजाल, पो हवा भीमराव वानखेडे ,राईटर कैलास सुरडकर. संतोष मुंजाळ, DB मॉन्टी माणकर, रवी झगरे, रवी सावळे, संदीप डाबेरावं,, संदुके, गोराने, यांनी सर्वांनी मिळून आज डागा पेट्रोल पम्प येथील गोडाऊन येथे दुपारी दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान केली आहे. सदर कारवाईमुळे विद्युत तार चोरी करण्याच्या टोळीवर नांदुरा पोलीस पीसीआर घेवून कायदेशीर कारवाई करीत असल्यामुळे विद्युत तार चोरीच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसविण्यात नांदुरा पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील तपास एएसआय मिलिंद जावंजाल व डीबी पथक करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here