पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कर्तव्य म्हणून आज (दि.१८) शहरातील शाळा नंबर ६, शाळा नंबर ७, शाळा नंबर ९, शाळा नंबर १०, गौतम विद्यालय, विवेक वर्धिनी विद्यालय, खड्डा वस्ती शाळा, तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थींनीना शाळा व महाविद्यालयचा पहिला दिवस आनंदी जावे म्हणून वह्या व पेन वाटप करण्यात आले.
यावेळी संजय निंबाळकर (मेंबर), कृष्णा वाघमारे (मेंबर), दुर्योधन यादव (दलित मित्र), रामेश्वर सातपुते (समाज सेवक), संतोष सर्वगोड (समाजसेवक), उमेश सर्वगोड (युवा नेते), राजाभाऊ देवकुळे, भोला साठे, दत्तात्रय यादव, अजित खिलारे, कबीर देवकुळे, संदेश कांबळे, पंढरीनाथ कदम, किरण अवघडे, बाळू मोरे, चंदू वाघमारे, निखिल गायकवाड, लखन खिलारे, वायदंडे, विशाल यादव, विनोद यादव, अमोल यादव, आयोजक अँड. बादल यादव आदी उपस्थित होते.








