रेल्वेची बोगी उचलत असतांना क्रेनचा हुक तुटून पडल्याने कामगाराचा मृत्यू

accident
file photo

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : क्रेनद्वारे रेल्वेची बोगी उचलत असतांना अचानक क्रेनचा हुक तुटून खाली उभ्या असलेल्या कामगाराच्या डोक्यात पडला. यामध्ये कैलास रमेश माळी (वय २७, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह. मु. वंजारी खपाट) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्सल कार्यालयाजवळ घडली याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाळधी येथील कैलास माळी याच्या आईवडीलांचे निधन झाल्यामुळे तो भावासह काका गिरधर माळी यांच्याकडे राहत होता. क्रेनवर काम करुन तो स्वतःचा उदनिर्वाह करीत होता. रेल्वे स्थानक परिसरात कामे सुरु असल्याने बुधवारी सकाळी पार्सल कार्यालयाजवळ असलेली रेल्वेची एक जूनी बोगी उचलून ती बाजूला ठेवण्याचे काम सुरु होते. त्या बोगीमध्ये कॅण्टीन सुरु करण्याचे नियोजन असल्यामुळे त्याठिकाणी तीन ते चार क्रेन मागविण्यात आल्या होत्या. क्रेनला साखळदंडासह क्रेनच्या पट्टच्या सहाय्याने क्रेनला बांधून बोगी उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र का ही वेळातच एका क्रेनचा हूक तुटून तो खाली उभ्या असलेल्या कैलासच्या डोक्यावर आणि नंतर मांडीवर पडल्याने त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. हूक पडून तरुण कामगार जखमी झाल्याचे कळताच तेथील कामगारांसह लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोउनि राजेंद्र पाटील व त्यांचे सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत कैलास माळी याला मयत घोषित केले. कामगारांनी व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here