पंढरपुरात शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून उत्साहात साजरा

शिवसेना

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. आज शिवसेना या संघटनेला 59 वर्ष पूर्ण होतायेत. या 59 वर्षांत शिवसेनेनं अनेक संकटं, अनेक वादळी वारे झेलले. तसंच अनेक मोठ्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला. या 59 वर्षांत बरंच पुलाखालून पाणी गेलंय.पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति प्रखर निष्ठा असलेला शिवसैनिक आजही शिवसेना म्हटलं कि गर्वाने छाती फुगविताना दिसून येतो.आणि याच शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आज पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

सकाळी ठीक अकरा वाजता पंढरपुर शहर व तालुकयातील शिवसैनिक आणि विविध पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसेना झिंदाबाद,उद्धव ठाकरे आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.तर शहरातील विविध भागात तसेच कुष्ठरोगी वसाहत,गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आश्रिताना मिष्ठान्न वाटप करण्यात आले.

यावेळी बाल शिवसैनिक विराज घोडके,उपजिल्हा प्रमुख जयवंत माने,उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे,तालुका प्रमुख बंडू घोडके,शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर,गौस पाक आतार,उप तालुका प्रमख संजय घोडके,उत्तम कराळे,नागेश रितुण्ड,महेश कांबळे,इलियास मुलाणी,समाधान गोरे,अजित भोसले,विजय जाधव,महेश यादव,भारत माने,समाधान जगदाळे,दिलावर मुलाणी,नजीर मुलाणी,वासू पवार,भारत कदम,भास्कर साळूंखे,बाळासाहेब रणदिवे,गजानन टल्लू,संगीता पवार,मंजुळा दोडमिसे,अनिता आसबे,शरीफा पठाण,अंकुश साळूंखे,कैलास नवले,दिलावर मुलाणी,वासुदेव पवार,अशफाक मुजावर,अतिश खुळपे,बापू कोळी,अण्णा पाटील,समाधान गिड्डे,पृथ्वीराज बंडगर,अनिल जाधव,उमेश साळूंखे,अंकुश साळूंखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here