मुलांचा बुध्यांक वाढवण्यावर भर द्यावा – यशवंत चव्हाण

बेलापूर(सी.बी.डी) विशेष प्रतिनिधी – कोरोनाच्या अदृश्य महामारी संकटाच भूत गेल्या पाच महिन्यापासून जगाच्या मानगुटीवर बसले आहे.कोरोना कोणावर झडप घालेल याची शाश्वती नाही म्हणून सर्वच स्थरावर स्थगिती आली.त्यात लहान व शाळेत जाणारी बालके यांची मात्र शारीरिक व मानसिक फरफट झाली.घरूनच सर्व अभ्यास करायचा त्यात इच्छा नसताना मोबाईलचा वापर करून द्यावा लागतो हि काळाची गरज आहे.सदर बाब करताना पालकांनी व शिक्षकांनी सुद्धा अभ्यासाबरोबर कंटाळा येऊ नये म्हणून मुलांना वेगवेगळ्या छंदात उदा.थोरामोठ्यांची कर्तृत्व,शिक्षणात,उद्योगात प्रगती करून देशसेवा कशी करता येईल याची शिकवण गोष्टींच्या माध्यमातून त्यांना कंटाळा न येता त्यात रुची निर्माण कशी होईल ह्या पद्धतीने सांगणे गरजेचे.मराठी हिंदी इंग्रजी ह्या भाषेतून दोन मिनिटे बोलण्याची सवय लावून त्यांची कौतुक व शाबासकी बक्षीस देऊन प्रोत्साहन द्यावे.सीमेवर लढणारे जवान व शेतात राबणारे किसान हे देशाचे आधारस्तंभ आहेत याची जाणीव करून द्यावी मुलांचे मन व शरीर स्थिर राहण्यासाठी दहा मिनिटाचे यॊगा करून घ्यावे.व बाकीचा वेळ त्यांना मोकळे सोडून मोबाईलवर मित्रांशी गप्पा व त्याचे आवडते गेम खेळण्यास मुभा द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here