नाशिक (प्रतिनिधी सतिश शेवाळे) : इयत्ता पहिली पासुन शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्नाविरोधात शाळांनी सतर्क व जागरूक राहावे. सदरचे राज ठाकरे यांचे पत्र शासनाच्या आदेशा विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन नाशिक च्या वतीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक वितरण भांडार बालभारती कार्यालय, ग्रामोदय शिक्षण संस्था, मॉडर्न एज्युकेशन शिक्षण संस्था या शाळांमध्ये देण्यात आले.
त्याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष अँड रतनकुमार इचम, नाशिक पश्चिम विधानसभा पक्ष निरीक्षक संदिप दोंदे, विभाग अध्यक्ष नितीन माळी, शहर उपाध्यक्ष अर्जुन वेताळ, सचिन रोजेकर, राजु परदेशी, भालचंद्र देसले, उपविभाग अध्यक्ष मनिष परदेशी, संदिप मालोकर, विश्वास रुपवते, कमलेश पाटील, आकाश भागवत, रोहन भामरे, शाखा अध्यक्ष विशाल गायकवाड, महिला सेना पदाधिकारी गौरी सोनार, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील. मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.








