जोतिबा डोंगर येथील क्लासमेंट ग्रुपचा अभिनव उपक्रम

क्लासमेंट ग्रुप

कोल्हापूर (प्रतिनिधी अनिल सांगळे) : जोतिबा डोंगर ,वाडी रत्नागिरी येथील सन 1991 ते 2001 मधील, क्लासमेंट ग्रुप ने समाजकार्याचे भान ठेवत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वितरण केले.

कुशिरे तालुका पन्हाळा,जिल्हा -कोल्हापूर, येथे सत्यशोधक प्राध्यापक रमेश ढावरे प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा आहे, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगची आवश्यकता आहे, हे समजल्यावर जोतिबा डोंगर येथील क्लासमेंट ग्रुपमधील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन रक्कम जमा करून, त्या रक्कमेतून 109 शालेय बॅगची खरेदी करून, आज शुक्रवार दिनांक 20/ 6 /2025 रोजी आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण केले,या वेळी क्लासमेट ग्रुप हा फक्त गेट-टुगेदर पुरता मर्यादित नसून यातून ठरवले तर अनेक सामाजिक कार्य करता येतात, असा संदेश यानिमित्ताने या क्लासमेंट ग्रुप ने दिला आहे असे मत या शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले, व या कामाबद्दल सर्वांचे कौतुक करून आभार मानले.
यानंतर क्लासमेट ग्रुप मार्फत शाळेच्या प्रांगणामध्ये पिंपळाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले , यावेळी सर्वांचे स्वागत श्री विकास तोरस्कर सर यांनी केले, व आभार प्राथमिक मुख्याध्यापक श्री एस के म्हेतर यांनी मानले, या कार्यक्रमावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.बी. कांबळे मॅडम, शिक्षक श्री प्रकाश जंगटे, श्री प्रल्हाद काळे, शिक्षिका सौ. स्वाती लोहार, सौ. छाया सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here