शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांचे स्वागत

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.

प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी स्वागत कार्यक्रम घेण्यात आला. प्रसंगी शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी (टेलर), प्राचार्य श्री.सुहास विसाळ, नवनिर्वाचित उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, नवनिर्वाचित पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे उपस्थित होते.
प्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी गोड संवाद साधला, तसेच त्यांना छान गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांनी देखील स्वागताला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
परिसरातील विविध शाळेंमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे मन शाळेत रमावे आणि त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबरच नवनिर्वाचित उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका आणि शिक्षक – शिक्षिका यांचे स्वागत करण्यात आले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची तयारी प्रशालेतील सेवक यांनी उत्तमरीत्या केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here