ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

ओन्ली समाजसेवा

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या गरजू व हुशार विद्यार्थ्यांना ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या मार्फत शालेय साहित्याचे वाटप आज सावळे सभागृह बार्शी या ठिकाणी एका कार्यक्रमांमध्ये करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.शाहू सतपालसाहेब प्रशासनाधिकारी, नगरपालिका बार्शी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री दिलीप ढेरे साहेब एपीआय, तालुका पोलीस स्टेशन बार्शी व मा. श्री ऋषिकेश मोरे सर थेरपिस्ट बार्शी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल वाणी यांनी केले. यामध्ये आतापर्यंत संस्थे मार्फत राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचा आढावा घेऊन सदर कार्यक्रमाचा हेतू सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय सौ. सुजाता अंधारे मॅडम यांनी करून दिला.
बार्शी शहरातील हुशार व गरजू एकूण दहा मुले व दहा मुली यांना शालेय साहित्याचे किट यामध्ये सॅक, कॉयर वह्या ,पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री जियान तांबोळी आयआयटी क्वालिफाय झाल्याबद्दल व श्री शिवकुमार माळी यांच्या थायलंड येथे झालेल्या सॉफ्टबोल स्पर्धेतील यशाबद्दल प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ढेरे साहेब यांनी आपल्या मनोगतात संस्थेमार्फत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमां बद्दल संस्थेचे कौतुक केले तर श्री मोरे सर यांनी विविध सामाजिक उपक्रमाची गरज स्पष्ट केली अध्यक्ष समारोपात श्री सतपाल साहेब यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करून संस्थेच्या वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे सध्याच्या परिस्थितीतील महत्त्व स्पष्ट केले.
सदरच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ रेखा विधाते यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. सौ.माधुरी शिंदे यांनी केले अच्छा या कार्यक्रमाला श्री संतोष शेळगावकर, उपाध्यक्ष माणकोजी ताकभाते, अजय तिवारी, अतुल वाणी, गणेश सातारकर, सुनील नवले, सुनील फल्ले, सुरेंद्र स्वामी, विजय येवारे आणि सायरा मुल्ला, कोमल वाणी, रेखा सरवदे, माधुरी वाणी राजश्री गवळी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here