शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : राज्य अधिक्षक -अधिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा नाशिक विभागीय मेळावा नुकताच नाशिक येथे पार पडला.या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या मेळाव्यात नाशिक विभागीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यात राज्य अध्यक्षपदी मनोहर कदम, राज्य कार्य अध्यक्षपदी राजेश अहिरे व राज्य सचिवपदी नामदेव वाघ यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व त्या समस्या वरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.यात विशेषतः महिला अधिक्षिका, सफाई कर्मचारी, साप्ताहिक बदली व सुट्टी, वाहन प्रोत्साहन भत्ता, अधिक्षक व अधिक्षिका प्रशिक्षण व प्रकल्प मासिक बैठक या विषयावर चर्चा करण्यात आली.
न्याय मागण्यांसाठी संघटना शासन पातळीवर प्रयत्न करेल,असे मेळाव्यात ठरले.संघटना सदस्य नोंदणी विषयी नवनियुक्त अध्यक्ष मनोहर कदम यांनी मनोगत व्यक्त केले.राज्य सचिव नामदेव वाघ यांनी संघटना स्थापने विषयी विचार व्यक्त केले.मेळाव्यात उमेश खैरनार,दिलीप पवार,किरण जोशी, रविंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन नाशिक प्रकल्प अध्यक्ष राजेश पवार यांनी केले.या वेळी नुतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.मेळाव्यासाठी नाशिक, नंदुरबार,यावल,कळवण, राजूर, धुळे प्रकल्पातील अधिक्षक व अधिक्षिका उपस्थित होते.बिनविरोधा राज्य सचिवपदी निवड झाल्याबद्दल नामदेव वाघ यांचा पिंपळनेर व सामोडे आश्रमशाळेत सत्कार करण्यात आला.







