पारोळा तालुक्यात प्रौढ महिलेचा खून करीत मृतदेह फेकला

निर्घृण हत्या
File Photo

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : पारोळा तालुक्यातून ४५ वर्षीय महिलेचा खून करीत मृतदेह जंगलात फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही. पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एका पोत्यात या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकर्‍या चारून घरी परत येत असताना त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात टाकून फेकून दिल्याचे आढळून आले. महिलेचे हातपाय बांधलेले होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.
घटनास्थळ अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी अमळनेर पोलिस पोहोचले. त्यानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत असल्याची खात्री झाली. बुधवारी रात्री दहा वाजल्यानंतर पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील, सुनील हटकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृताची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here