मिरज (प्रतिनिधी) : नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त आज मिरजेच्या कलाकारांनी बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे नटसम्राट बालगंधर्व यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्टचे प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नटसम्राट बालगंधर्व यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले नाटक मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिरात सादर केले होते त्यामुळे मिरजेच्या बालगंधर्व रंगमंदिरास सरकारी थेटर राजहंस थिएटर आणि नंतर बालगंधर्व नाट्य मंदिर असे नाव मिळाले बालगंधर्वांनी या ठिकाणी पहिला प्रयोग केल्यामुळे आणि त्या प्रयोगास छत्रपती श्री शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांची उपस्थिती या प्रयोगास लाभल्यामुळे या नाट्य मंदिरास अन्यसाधारण महत्त्व आहे.
बालगंधर्व नाट्य मंदिराची दुरुस्ती आणि तेथील गैरसोय कलाकारांच्या मागण्या याचे निवेदन आयुक्तांना लवकरच देऊन या संदर्भात कलाकारांची बैठक घेण्याचे ओमकार शुक्ल यांनी सांगितले. यावेळेस नाट्य्यांगण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बरगाले, प्रशांत गोखले, धीरज पलसे कविता घारे, डॉ चैत्राली शुक्ल, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष मनोज यादव, चैतन्य तांबोळकर, संजय रुपलग, बालकलाकार हिरणमयी शुक्ल, बालकलाकार अर्णव यादव, दिगंबर कुलकर्णी विनायक इंगळे उपस्थित होते.यावेळी मिरज शहरातील अनुभवी कलाकार लेखक दिग्दर्शक धीरज पल्से यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.







