सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीच्या मार्गदर्शकपदी महावीर गांधी यांची निवड जाहीर

सराफ सुवर्णकार

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीच्या, मार्गदर्शक पदी सराफ सुवर्णकार आसोसिएशन चे शहर जिल्हाध्यक्ष प्रसिध्द सराफ महावीर नानचंद गांधी यांची निवड प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांनी आज जाहीर केली त्यांना संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे यांचे हस्ते पञ देऊन सन्मानित करण्यात आले

येथे आयोजित पंढरपूर शहर सराफा असोसिएशन च्या मार्गदर्शन मेळाव्यात हि निवड जाहीर करण्यात आली, तालुका अध्यक्षपदी. दिपकजी द्तात्रय श्रीगंदे तालुका उपाध्यक्षपदी. संदेशजी सोनार (दहिवाल)स तालुका संपर्क प्रमुख,गणेशजी अष्टेकर यांची निवडी या वेळी करण्यात आली. बैठकीस प्रबोधन करताना प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुऱ्हाडे कार्याध्यक्ष अ‍ॅड विशालजी वेदपाठक यांनी ४११\ ३१७ बद्दल ची परिपूर्ण माहीती सराफा व्यावसायिकांना दिली.व सराफ व सुवर्णकार बांधवानी, चोरीच्या गुन्हात तपासकामी येणाऱ्या अधिकारयांना महाराष्ट्र शासन निरर्गमित जी. आर.नुसार सहकार्य करणे व संबंधित अधिकारी ने पण जी. आर. नुसारच कारवाई करावी.. तसेच सराफ बांधवानी.. बेकायदेशीर सोने रिकव्हरी देऊ नये. तपासात कायदेशीर मार्गानेच सामोरे जात तपासाला सहकार्य करावे.. आणि एजन्ट्स भ्रष्ट अधिकाऱ्यांना बळी पडू नये.. न्यायलीन मार्गानेच तपासा मध्ये सहकार्य करावे असे मत प्रदेशाअध्यक्ष यांनी व्यक्त केले.
या वेळी, पाश्चिम महाराष्ट्र उपाअध्यक्ष गोकुळजी लोळगे,उत्तर महाराष्ट्र उपा अध्यक्ष निलेशजी पंडित, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रथमेश नगरकर, जिल्हा संपर्क प्रमुख उमेशजी बागडे, माळशिरस ता. प्रमुख गणेशजी मैड, प्रदीपजी ढाळे, सोमनाथजी अवताडे, अयोध्या ज्वेलर्स चे संचालक मोहितेजी, सराफ असो चे सन्मानीय सराफ बांधव आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here