पिंपळगाव बसवंत शहरात चार लाख रुपयांचा गांजा जप्त; एकास अटक

गांजा

नाशिक (उपसंपादक संतोष रायचदे) : नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जिल्हाभरात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केले आहे दरम्यान पिंपळगाव बसवंत येथून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून अनिकेत खैरनार या आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातील २३ किलो ६१० ग्रॅम बाजार किंमत ४ लाख ७२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे आरोपी विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि.२५) स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी अंमली पदार्थ विक्री करणारा अनिकेत संदीप खैरनार (वय २२, रा.उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत) याला ताब्यात घेऊन, त्याच्या ताब्यातील २३ किलो ६१० ग्रॅम बाजार किंमत ४ लाख ७२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे, त्याच्याविरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) ।। (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदीप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चापोहवा संतोष पाटील, तानाजी झुरडे यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here