भडगाव (तालुका क्राईम रिपोर्टर अमीन पिंजारी) : कजगाव ता.भडगाव येथे कजगाव,घुसर्डी,पासर्डी येथे एकाच रात्रीत चार घर फोडत रोकड सह काही सोन्याचा ऐवज लांबविल्याने नागरिकात घबराट पसरली आहे.
कजगाव परीसरात चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे घरफोड्या मोटरसायकल चोरी चे प्रकार ब्रेक के बाद सुरूच आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात भडगाव पोलिसांना यश आलेले नाहि दि.२६ च्या मध्यरात्री नंतर येथील गजबजलेल्या राणा पॉइंट चौकातील सुदर्शन भिला अमृतकर यांचे घर फोडत येथुन मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लांबवली तेथुन तीन किलोमिटर अंतरावरील पासर्डी येथील भारत नगर मधील अर्जुन विठ्ठल पाटील यांचे घर फोडत येथुन वीस हजार रुपये रोख लांबवले तेथुन काही अंतरावरील घुसर्डी येथुन बळीराम हरी जाधव व निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला एकाच रात्रीत चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे. शेती मशागत सह खत मजुरी साठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे आता खत मजुरीचा जुगाड कसा करावा या विवंचनेत शेतकरी पडला आहे.







