आर. सी. पटेल विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम

आर. सी. पटेल

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर पवन मराठे) : येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्यसन मुक्ती दिनानिमित्त विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.

व्यसनाधिनता व युवाजागृती हा कार्यक्रमाचा विषय होता.या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून धुळे येथील पालेशा महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास चव्हाण, शिरपूर पोलीस स्टेशनचे पी.आय किशोरकुमार परदेशी, ए. पी. आय हेमंत खैरनार, प्राचार्य पी. आर. साळुंखे, पर्यवेक्षक डाॕ. एस. एन. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एस.आय. हेमंत खैरनार यांनी केले.त्यात त्यांनी व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो,नकारात्मकता वाढते. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. विलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे मानसिक व सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले.व्यसन म्हणजे मृत्यूचे आमंत्रण होय.व्यसनापासून दूर राहून स्वतःचे करियर घडविणे गरजेचे आहे.प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवनशैली, व्यसनमुक्त समाज व व्यसनमुक्त राष्ट्र निर्मिती साठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक डाॕ. एस. एन. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पो.हेड काॕ.चंदन सोनार, पो.काॕ.प्रशांत बाविस्कर व विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. बी. एन. अहिरे, डी.एस.साळुंखे, एस. आर. पाटील, एस. आर. महाजन,श्रीमती रुपाली जोशी, श्रीमती जे. जे. माळी, श्रीमती एस. बी. हुलसुरे, जी. एस. मराठे, कपिल बाविस्कर, बी. जे. गायकवाड, शिवराज बाविस्कर अमोल सोनार, एन के.देवरे, एम.एम.परदेशी आदी शिक्षकांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here