शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शहरातील साई संगम प्रतिष्ठान च्या वतीने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल. नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरात रविवार दिनांक २९ जून रोजी नऊ ते दुपारी एक या वेळेत शिर्डी येथील हॉटेल साई संगम येथे नेत्र तपासणी व मोतीबंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संदीप भीमाशंकर सोनवणे यांनी दिली
संदीप सोनवणे म्हणाले की खाजगी वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्त्रक्रिया यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने रुग्णांची अडचण ओळखून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेत्र शस्त्रक्रिया व मोतीबिंदू चिकित्सा व डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले असून रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावे त्याबरोबरच येणाऱ्या रुग्णांची निवास व भोजन व्यवस्था देखील करण्यात आली असून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून रुग्णाचा या शिबिराच्या माध्यमातून आर्थिक खर्च येऊ नये हा उदांत हेतू ठेवून हे शिबिर घेण्यात येत असून रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी आव्हान संदीप सोनवणे एका पत्रकाद्वारे केले आहे







