
नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : आज (दि.२४) अचानक देवळा येथील पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री सार्थक नेहेते यांनी कारखान्याच्या कार्यस्थळाला भेट दिली, सुमारे एक ते दीड कि, मी, पर्यंत चिखलात पायी प्रवास करत कारखान्याच्या दक्षिण आणि पूर्व दिशेला पडलेल्या दगडी भिंतिची पहाणी केली.
सुमारे दहा बारा ठिकाणी भिंतिना लांबच लांब भगदाडं पाडलेले काही ठिकाणी पाडलेले असल्याने कारखान्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, शिखर बँकेच्या ताब्यात असलेल्या संवादाच्या सुरक्षेसाठी फक्त दोन रोजंदारीवरील दोन कर्मचारी तैनात केलेले होते, उद्या देवळा येथे होणाऱ्या लक्षवेधी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर श्री सार्थक नेहेते यांनी कारखान्याच्या माजी अधिकारी व वसाका मजदुर युनियनचे मा, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांच्या सोबत पहाणी केली,असता कारखान्याच्या बाहेरच्या बाजुने सुरक्षेच्या दृष्टीने पहाणी केली, बिबट्यांच्या धाकाने आत मध्ये प्रवेश न करता गेटच्या समोरुनच सुरक्षा कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या,
कारखान्याच्या दक्षिण बाजूस बिबट्या पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा धुळखात पडुन असल्याचे ही निदर्शनास आले, बिबट्या आत कारखान्यात अंन पिंजरा बाहेर असा वन विभागाचा कारभार बघावयास मिळाला, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी कारखान्याच्या अतिथी ग्रहावरील शेतकरीनिविस, तसेच जुन्या आश्रम शाळेच्याही जागेचीही पहाणी केली, यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव , कैलास कोकरे पोलिस हवालदार श्री दिलीप सोनवणे हे ही उपस्थित होते,,,






