शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : सहकाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला अहिल्यानगरच्या जिल्हा उपनिबंधक पदी मंगेश सुरवसे यांनी पदभार स्वीकारला आहे.साखर कारखाना, पतसंस्था, सेवा सोसायटी, जिल्हा बँक, शेड्युल बॅक अशा विविध सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अग्रगण्य असलेल्या नगर जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक पदी गणेश पुरी यांनी जवळपास ४ वर्ष कामकाज पाहिले.त्यांची प्रशासकीय मुंबई येथे मंत्रालयात बदली झाल्याने.सांगली येथुन बदली झालेल्या सुरवसे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.
यावेळी स्वाभिमानी सचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश रेवगडे, कार्याध्यक्ष संतोष कळमकर, सरचिटणीस रावसाहेब सोनार, खजिनदार मंगेश देशमुख, गणेश पाचपुते व संघटनेच्या पदाधिकारी यांनी स्वागत सत्कार केला.यावेळी नगर जिल्ह्यात लवकरच होणारे राज्यस्तरीय सचिव महाअधिवेशन विषयी चर्चा करण्यात आली.







