वज्रनाद वाद्य पथकाचा वाद्यपुजन सोहळा उत्साहात संपन्न

वज्रनाद

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : वज्रनाद वाद्य पथकाचा प्रथम वाद्यपुजन सोहळा रविवार दि. 23 जुन 2025 रोजी खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी सर, विश्व हिंदू परिषदेचे ललित भैय्या चौधरी, अनुभूती शाळेच्या जनसंपर्क अधिकारी सौ.रुपालीताई वाघ, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराजजी कावडीया, भारतीय जनता युवा मोर्च्याच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ.भैरवीताई वाघ पलांडे, प्रदेश सचिव अमितजी सोळुंखे, सोहमजी खडके, भारतीय जनता युवा मोर्च्याचे कल्पेशजी सोनवणे, दिलीपजी नाझरकर, तरुण कुढापा मित्र मंडळाचे प्रशांतजी सुरळकर आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोजजी चौधरी यांनी केले. वज्रनाद वाद्यपथकात 120 मुले तर 35 मुली असे एकुण 155 वादकांचा समावेश असून पथकाचा हा पहिला वर्ष आहे. दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती आदी उत्सवात सदर पथक आपली प्रस्तुती देणार आहे.

मराठी अस्मिता व पारंपारिक वाद्याविषयीचे प्रेम आजच्या युवा पिढीमध्ये तेवत रहावे या हेतुने वज्रनाद वाद्य पथकाचे कार्य अविरत सुरू राहणार आहे. वाद्यपूजन सोहळ्याच्या यशश्वीतेसाठी वज्रनाद वाद्य पथकाचे सोनू चंदन, अविनाश साली, मनीष पाटील, हरीश गजलवार, मोहित पाटील, सिद्धार्थ पाटील, रोहित कोळी, विजय ठाकूर, सिद्धार्थ कव्हाने आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. वज्रनाद पथकात सामील होण्यासाठी सोनू चंदन (7385519163) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन वज्रनाद वाद्य पथकातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here