माजी खासदाराच्या पीएची हत्या; चाकूने सपासप वार करत घेतला जीव

निर्घृण हत्या
File Photo

लुधियाना (वृत्तसंस्था) : मध्यरात्री माजी खासदाराच्या पीएची चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली आहे. शिरोमणी अकाली दल पक्षाचे माजी खासदार जगदेव सिंह तलवंडी यांचे पीए कुलदीप सिंह मुंडिया यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. तलवारीने सपासप वार करत त्यांचे तुकडे करण्यात आले. घटनेस्थळावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी या भयंकर घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

फार्महाऊसमधून कुलदीप सिंह मुंडियां शुक्रवारी रात्री उशिरा कारने बाहेर निघाले होते. रस्त्यात त्यांना आरोपींनी घेरलं अन् जबरदस्तीने बाहेर खेचलं. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तलवारीने त्यांच्यावर सपासप वार केले. जोपर्यंत कुलदीप यांचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत आरोपींनी सपासप वार केले. कुलदीप यांचे हात-पाय धडापासून वेगळं करत त्यांचा निर्घृण खून केला.
कुलदीप यांच्यावर आरोपी सपासप वार करत होते, तेव्हा आजूबाजूला लोक ये-जा करत होते. पण कोणत्याही व्यक्तीने आरोपींना अडवण्याची हिंमत केली नाही. कुलदीप सिंह यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. भीतीमुळे पण एकजणही धावला नाही. एका व्यक्तीने हिंमतीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाब आणि लुधियानामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here