ट्रकचा धक्का लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

accident
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : सिंहगड रोड येथील तुकाईनगर भागात ट्रकचा धक्का लागून पडल्याने दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सई श्रीकांत भागवत (२०) असे अपघातात मृत्यू पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सई ही सर परशुराम महाविद्यालयात बी. ए’च्या तृतीय वर्षाला शिकत होती. गुरुवारी दुपारी ती दुचाकीवरून कॉलेजहून घरी जात होती. तुकाईनगर येथून जाताना तिच्या दुचाकीला ट्रकचा धक्का बसला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून सिंहगड रोड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here