४५० रुग्णांनी केली कोरोनावर मात; १२ कोरोनाबाधितांचा झाला मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.२०) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी तब्बल ५४० आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव आणि जळगाव शहरात संसर्ग वाढत असून, प्रशासनाच्यादृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान आज ४५० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जिल्ह्यात ५४० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक ८० कोरोनाबाधित हे पाचोरा तालुक्यातील असून, त्यानंतर जळगाव -७२, चाळीसगाव-६९, अमळनेर-५३ असे आढळून आले आहे. या व्यतिरिक्त जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-३९, चोपडा-१८, पाचोरा-८०, भडगाव-४१, धरणगाव-१०, यावल-१, एरंडोल-२९, जामनेर-१९, रावेर-१७, पारोळा-५९, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१६; बोदवड-५ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३ असे कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या २० हजार २२७ इतकी झाली असून, यातील १३ हजार ९७७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ७०० झाला. सद्यपरिस्थितीत ५ हजार ५५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.







