वसाका जमीनधारक कामगारांचे उपोषण तहसीलदारांच्या मध्यस्तीनंतर मागे

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व जमीनधारक कामगारांनी आज देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. मात्र नंतर तहसीलदारांनी मध्यस्ती केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जपत जमीनधारक कामगार आपल्या कुटुंबियांसमवेत आमरण उपोषणाला बसले होते. कामगारांच्या थकित वेतनासह कारखाना सुरु करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी ही त्यांनी आग्रही भूमिका हो. तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी उपोषणस्थळी भेट देवून कामगारांची बाजू ऐकून घेतली. तात्काळ धाराशिव कारखाना प्रशासन, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांना कामगारांच्या भावना व प्रश्न कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर, कामगारांनी सामंजस्य दाखवून उपोषण मागे घेतले.
कारखाना सुरु करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जमीनधारक कामगारांचे नेते शशिकांत पवार यांनी दिला. यावेळी वसाका मजदुर युनियन चे अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव ,वसंत पगार ,आनंदा देवरे ,प्रताप देवरे , दादाजी सोनवणे , समाधान निकम ,निंबा निकम ,भरत पवार , हंसराज पवार , सुधाकर सुर्यवंशी , नानाजी पवार ,मंहेद्र पवार ,पोपट वाघ , दोधा पवार आदी सहभागी झाले होते , यावेळी स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजु शिरसाठ , समन्वयक कुबेर जाधव ,प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी पुर्णवेळ पाठींबा दर्शवुन भविष्यात वसाका सुरू करणे साठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे ठामपणे सांगितले. यावेळी लोहणेर, सटवाइवाडी, विडेवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी पाठींबा देण्यासाठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here