ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : रविवारी (दि.२९) दुपारी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचा ठाणे शहर कमिटी आणि तालुका कमिटी पदनियुक्तीचा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला यात अनेक युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी आपली हजेरी लावली. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मिडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगल डोंगरे, ठाणे जिल्हा महासचिव शरद घुडे, पालघर जिल्हा अध्यक्ष रंगनाथ तांगडी ठाणे जिल्हा प्रवक्ते संतोष चव्हाण ठाणे जिल्हा साप्ताहिक विंगचे अध्यक्ष अशोक पाटोळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वनिता त्र्यंबके, तालुका अध्यक्ष कृष्णकांत फुलोरे, ठाणे शहर अध्यक्ष श्री. भुजंगराव सोनकांबळे हे मान्यवर पत्रकार उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.







