पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : सोलापूर शहर पोलीस दलात नवीन नेतृत्वाची भर पडली असून, आयपीएस अधिकारी गौहर हसन पोलीस उपायुक्त (DCP) पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांनी माजी उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.
गौहर हसन यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना भारतीय पोलीस सेवेत (IPS) स्थान मिळाले. त्यांची १३७ वी रँक होती. ते मूळचे बिहारचे आहेत. गौहर हसन यांनी विशेषतः मुस्लिम समाजात महिला शिक्षणावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. ते धाराशिव (उस्मानाबाद) येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.







