जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर अशोक तायडे) : भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्टीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्टीय मुस्लीम मोर्चा, भारतीय युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व राष्टीय पिछड़ा वर्ग मोर्चाचे विकास चौधरी पटेलयांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर १ जुलै रोजी भारत बंद हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
या अनुषंगाने जळगाव जिल्हात २० ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. त्यापैकी यावल तालुक्यातील फैजपूर शहर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या तालुक्यात भारत बंद आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव भालेराव व भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रद्युम्न वारडे यांनी केले.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी महिला अन्याय आत्याचार विरोधी समिती, निळे निशाण समाजिक संगठन, तडवी आदिवाशी एकता मंच, भीम आर्मी भारत एकता मिशन, भिमशक्ती मित्र मंडळ फैजपूर या विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सक्रिय सहभागी होत पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान EVM मशीन बंद करुण निवडनुका हया बैलेट पेपर वर घेण्यात याव्या, केंद्र सरकार द्वारा OBC ची जातणिहाय जनगणना न कारण्याच्या विरोधात, अमित शाह द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याच्या विरोधात, बोधगया महाविहार मुक्ति साठी व १९४९ चा BT एक्ट विरोधात, वफ्फ संशोधन कायदा रद्द करण्यात यावा यासाठी, आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, शेतकऱ्या च्या शेतमालाला हमीभाव न देण्याच्या विरोधात, जुनी पेंशन लागू न करण्याच्या विरोधात, सरकारी क्षेत्राचे होत असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात मागण्या व मुद्दे मांडण्यात आले.







