नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : मागील काही महिन्यांपूर्वी सातत्याने देवळा तालुक्यात अवैध धंदे, अवैध वहातुक, गुटखा तस्करी, अवैध दारू व मटका या धंद्यांना उत आला होता,, त्याला आळा घालण्यासाठी, अत्यंत कठोर पावले उचलुन बहुतांशी प्रमाणात यश आले आहे,अशा अवैध धंद्यांना आळा बसविण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा वाढदिवस देवळा येथील ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला, समाजासाठी मार्गदर्शक, देवळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. सार्थक नेहते यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनेक मान्यवरांनी दिल्या,
गेल्या चार ,पाच महिन्यांपूर्वी देवळा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी आपल्या कार्यशैलीतून संपूर्ण तालुक्यात एक वेगळी आणि प्रभावी छाप निर्माण केली आहे. तक्रारदारांची बाजू समजून शांतपणे ऐकून घेणं, न्यायनिष्ठ भूमिकेने प्रत्येक प्रकरणाकडे पाहणं, आणि कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांच्या ह्या कार्यकाळात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत संवेदनशीलता राखली असून, कोणतीही अप्रिय घटना घडू न देता शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यश मिळवलं आहे. लोहोणेर, तसेच कारखाना परीसरात होणाऱ्या चोऱ्या,व अवैध धंदे,यांचा बंदोबस्त, वसाका कर्मचारी उपोषण, शिस्त, संवेदनशीलता आणि साधेपणा,यांचा सुरेख संगम म्हणजे सार्थक नेहते. अशाच कार्यक्षम आणि प्रेरणादायी पोलिस प्रशासनाची देवळा तालुक्यालाआवशकता, असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले आहे,







