शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे यांना दूरध्वनीवर ठार मारण्याची धमकी

शिवसेना शिंदे गट

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिंदे गटाचे शिवसेना मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मुकुंद शामराव नन्नवरे राहणार पाळधी तालुका धरणगाव यांना भमणध्वनी.8881204222व 8788903581 याद्वारे पाच जून ते 23 जून पर्यंत रात्री अपरात्री गुंड प्रवृतीच्या अज्ञात इसमाने अश्लील भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिलेली आहे

त्याबाबत पाळधी पोलीस दूर क्षेत्रात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कारवाई न झाल्याने महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदन देण्यात आले मुकुंद नन्नवरे यांना धमकीमुळे त्यांचे कुटुंब अस्वस्थ झाले असून कुटुंबात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सदर अज्ञात व्यक्तीची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी अशी मागणी आदिवासी टायगर सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने पंढरीनाथ मोरे राज्य पुवक्ता संभाजी सोनवणे जिल्हा सचिव रुपेश सोनवणे तालुका सचिव विलास मालचे धरणगाव ता अध्यक्ष विशाल बोरसे ता सदस्य खंडू पवार अजय सोनवणे जमनादास पवार वीरभान सोनवणे ज्ञानेश्वर ठाकरे रतिलाल सोनवणे अजय शिंदे गणेश अशोक यांच्यावतीने धरणगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन चौकशी करून गुन्हा दाखल करावे अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here