समुद्राच्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेस कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांनी वाचविले

पोलीस

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : दिनांक 02/07/2025 रोजी 17.00 वाजेच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट, येथे वॉचर म्हणून नेमणुकीस असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे पो. शि. क्रमांक 080294/साईनाथ देवडे हे गॅलेक्सी अपार्टमेंट समोर असलेल्या प्रमोनेड परिसरात गस्त करीत असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात एक महिला बुडताना आढळल्याने त्यांनी त्वरित धावत जाऊन पाण्यात उडी मारून त्या महिलेस पाण्याबाहेर काढले. सदर महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने तिला त्वरित वांद्रे 5 मोबाईलच्या सहाय्याने भाभा हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

नमूद महिलेचे नाव श्रीमती व्हेनेनटीया सरिता क्रासटा, वय 53 वर्ष, राहणार आशियाना अपार्टमेंट, सेंट बाप्टिस्ट रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई असे असून ती मनोरुग्ण आहे व गेल्या 20 वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिनांक 02/07/2025 रोजी 17.00 वाजेच्या सुमारास ती बँडस्टँड परिसरात फिरत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तिचा पाठलाग करीत आहे असे तिला जाणवले व घाबरून तिने समुद्राच्या पाण्यात उडी मारली. त्यावेळी पाण्यात गटांगळ्या खात असताना तिला पो शि क्र 080294/साईनाथ देवडे यांनी पाण्यातून बाहेर काढले. सदर महिलेची प्रकृती स्थिर असून याबाबत तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून चौकशी केली असता याबाबत त्यांचा संशय अथवा तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here